लोकल वाहतूक ठप्पच

आंबिवली स्थानकाजवळ लेव्हल क्रॉसिंग करत असताना एका डंबरने रेल्वे गेटला धडक दिल्याने ओव्हरहेड वायरचा विद्युतपुरवठा खंडीत झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. मात्र, ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असले तरी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेकडील लोकल वाहतूक ठप्पच झाली आहे.ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असले तरी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेकडील लोकल वाहतूक वाहतूक ठप्पच झाली. ऐन गर्दीची वेळ असल्याने सध्या मध्य रेल्वेच्या स्थानकांवर मोठी गर्दी उसळली आहे. यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली आहे. दरम्यान, दोन तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे.