ठाणे-पनवेल-वाशी एसी लोकल बंद करा

ठाणे : ठाणे-पनवेल-वाशी ही एसी लोकल बंद करून पूर्वीप्रमाणेच रेल्वेसेवा सुरू ठेवा, अशी मागणी ठाण्यातील ३६ महिला प्रवाशांनी केली आहे. यासाठी त्यांनी शुक्रवारी ठाणे रेल्वे प्रबंधक आर.के. मीना यांची भेट घेऊन त्यांना आपल्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन दिले आहे.या निवेदनात, ठाणे ते पनवेल एसी सेवा सुरू करून आनंदाची बातमी रेल्वे प्रशासनाने दिली. परंतु, रोजचा प्रवास पाहता या सेवेचे तिकीट व महिन्याचा पास सर्वसामान्य प्रवाशांना न परवडणारा आहे.