ठाणे : क्लस्टर योजनेला चालना देण्यासाठी ठाणे महापालिकेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. किसननगरसारख्या भागात ही योजना रुजवण्यासाठीच ही पावले उचलण्यात येत असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार, क्लस्टर योजना राबविण्यासाठी रेंटलची पॉलिसी ठरविली जात आहे. या धोरणानुसार ज्या ठिकाणी पालिकेची रेंटलची घरे असतील, ती घरे या योजनेसाठी दिली जाणार शिबिरे कमी पडल्यास पालिका संबंधित रहिवाशांना भाडे देणार आहे.
क्लस्टर योजनेसाठी ठाणे पालिकेची रेंटल पॉलिसी