१०० वे नाट्यसंमेलन आता पावसाळ्यानंतर

मुंबई:करोना विषाणूच्या वाढत्या फैलावाचा फटका १००व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनालाही बसला आहे. २२ मार्चपासून सांगली येथे नाट्यजागराने संमेलनाला सुरुवात होणार होती. मात्र आता हे संमेलन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. हे संमेलन सलग ८० दिवस होणार होते. त्यामुळे आता पावसाळ्यानंतर किंवा दिवाळीच्या आसपास संमेलन होऊ शकते. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेने शुक्रवारी संमेलन पुढे ढकलल्याचा निर्णय जाहीर केला.